खेड तालुक्यात जमिनीच्या वादातून ‘कार अटॅक’; तिघांवर गुन्हा


प्रतिनिधी ; राहुल बुट्टे

खेड : जुना जमिनीचा वाद उफाळून आल्याने एका व्यक्तीला कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना खालुंब्रे (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण बबन शिंदे (वय ३८, रा. संस्कृती निवास, पवारवाडी, खालुंब्रे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ मे रोजी रात्री सुमारे ९.५१ वाजण्याच्या सुमारास पवार वस्ती, खालुंब्रे येथे घडला.

याप्रकरणी खंडू बापू पवार (वय ५०), पोपट बापू पवार (वय ५५, दोघेही रा. पवारवस्ती, खालुंब्रे) तसेच एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शिंदे यांनी त्यांची फॉर्च्युनर कार (एमएच १४ एलएच १५१६) शेडमध्ये पार्क करून घराकडे जात असताना आरोपींनी जुना जमिनीचा गट क्रमांक १०८, ११० आणि ४९ च्या वादातून दबा धरून बसल्याचा आरोप आहे. घराच्या गेटजवळ आल्यानंतर आरोपींनी स्विफ्ट कार (एमएच १४ एलवाय ०५१५) अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०९(१), ११८(१) आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि महाडिक करीत आहेत.


1
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!