By, Tushar Lavhe
लोणी काळभोर : Riverview मधील फाल्कन सोसायटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम फाल्कन मॅनेजिंग कमिटी, कल्चरल टीम आणि सर्व रहिवाशांच्या सक्रिय सहभाग व सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रमोद कारकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा वेध घेणारे प्रेरणादायी व्याख्यान दिले. या प्रसंगी सोसायटीतील लहान मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.

सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या बालकलाकारांना श्री हिरेमठ साहेब यांच्या हस्ते प्रोत्साहनपर पदके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहन कुंभारकर आणि अमोल खेडेकर यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली. तसेच रांगोळी व्यवस्थापनाची जबाबदारी अमृता धस यांनी उत्कृष्टरीत्या सांभाळली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद बोराटे, सोनाली देशमुख आणि विष्णू तहकीक यांनी प्रभावीपणे केले, तर मीनल पडोळे यांनी आभारप्रदर्शन केले.
या सोहळ्याच्या आयोजनामध्ये सोसायटीचे अध्यक्ष मोहन कामठे, खजिनदार अजित गुप्ता तसेच रणजीत जाचक, पांडुरंग गाडे, बाबासाहेब कानगुडे, यशपाल कांबळे, अनिल अव्हाड, तुषार काळभोर, तुषार लव्हे आणि दीपक धायगुडे यांचा सक्रिय सहभाग होता.

तसेच रिव्हरव्ह्यू सिटीच्या PMS व सुरक्षा विभागाचेही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभले.
शिवचरित्रावरील श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक जाणीव यांचे सुंदर दर्शन घडविणारा हा शिवराज्याभिषेक सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








