खुनाचा प्रयत्न प्रकरणातील तीन महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखेची अटक


By, Avishkar Fule

पुणे, दि. ७ जून – खुनाचा प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आणि गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने सापळा रचून अटक केली आहे.

गुन्हे शाखा युनिट-२ चे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गवळी व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश मांढरे, विनोद चव्हाण, संजय आबनावे आणि ओमकार कुंभार हे गुन्हे प्रतिबंधक गस्त व रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ४४/२०२६ मधील पाहिजे आरोपी सागर सिंग काळूसिंग जुन्नी (वय ३८, रा. बौद्धविहारजवळ, दापोडी, पुणे) हा कॅम्प परिसरातील आझम कॅम्पस ते आग्रा हॉटेल समोरील रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

Screenshot

ही माहिती युनिट-२च्या प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची ओळख पटविण्यात आली. त्यानंतर मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडून खात्री केली असता संबंधित गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे व तो फरार असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्याला अटक करण्यात आली आहे. सागर जुन्नी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गवळी तसेच योगेश मांढरे, विनोद चव्हाण, ओमकार कुंभार, संजय आबनावे व इतर पथकाने केली.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!