वाघोलीत गुटखा तस्करीवर गुन्हे शाखेचा घाला ; कारसह ४.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त


By, Avishkar Fule

पुणे, ता. २० : वाघोली परिसरात कारमधून प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्या युवकाला गुन्हे शाखेच्या युनिट ७ ने सापळा रचून पकडले. या कारवाईत गुटखा व वाहनासह तब्बल ४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका युवकाविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या युनिट ७ चे पथक रविवारी (ता. १८) गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलिस अंमलदार किरण पलांडे आणि विनायक साळवे यांना गोपनीय माहिती मिळाली. वाघोली परिसरातून एक इसम कारमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वाघोली-केसनंद रस्त्यावर रॉयल गादी कारखान्यासमोर, काळेचा ओढा येथे सापळा रचला.

पोलिसांनी संशयित शेवरोलेट कार (एमएच ०५ सीएच ०५३४) अडवून तपासणी केली असता अरुणकुमार भलाराम खत्री (वय २०, रा. कोरेगाव भीमा, ता. हवेली) याच्याकडे विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको आणि प्रीमियम आरएमडी पान मसाला असा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

या कारवाईत १ लाख २२ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहनासह एकूण ४ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ७ चे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पोलिस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, प्रशांत कापुरे, विनायक साळवे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, किरण पलांडे, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, समाधान पाटील आणि प्रतिक्षा पानसरे यांनी ही कारवाई केली.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!