पाबळमध्ये घरातून दीड लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; युवकावर गुन्हा


By, सुरज जगताप

पाबळ, ता. १५ : शिरूर तालुक्यातील पाबळ येथील जाधव वस्ती, जमदाडे मळा परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे १ लाख ५३ हजार रुपयांचा अवैध गुटखा हस्तगत करण्यात आला असून, संबंधित युवकाविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला किशोर सुभाष जाधव याने आपल्या घरात बेकायदेशीररीत्या गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अन्नसुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला. झडतीदरम्यान शासनाने बंदी घातलेला आणि आरोग्यास घातक ठरणारा मोठ्या प्रमाणातील गुटखा आढळून आला.

पथकाने संपूर्ण साठा जप्त करून संबंधित युवकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी अन्नसुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सोमनाथ सावळे यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी किशोर सुभाष जाधव (वय २४, रा. जाधव वस्ती, जमदाडे मळा, पाबळ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत


29
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!