उरुळी कांचन परिसरात किराणा दुकान फोडून ३० हजारांची चोरी; तिन्ही आरोपी अटकेत


By, Tushar lavhe

उरुळी कांचन : सोरतापवाडी परिसरातील एका किराणा दुकानाचे शटर कापून ३० हजार रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना २२ मे २०२६ रोजी पहाटे ४.३० ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत नरेंद्र पुम्माभाई देसाई (वय २३, व्यवसाय किराणा दुकान, रा. सोरतापवाडी फाटा, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देसाई यांचे ‘बालाजी ट्रेडर्स’ नावाचे किराणा दुकान असून, अज्ञातांनी दुकानाचे शटर कापून गल्ल्यात ठेवलेली ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपी अजय युसुप मौजन (वय २२, रा. वाघोली), सुमित सुनिल बोराटे (वय १९, रा. खराडी) आणि ऋषिकेष बिभीषण शिर्के (वय १९, रा. लोणीकंद) यांना अटक केली. तिन्ही आरोपींनी संगनमताने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात गु.र. नं. १२५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३३१(४), ३०५ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार उद्धव गायकवाड यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण चौधर करीत आहेत. या कारवाईवर प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक वांगडे यांचे मार्गदर्शन लाभले.


20
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!