By Avishkar Fule
पुणे, ता. २७ : पुणे शहर पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई करत एका तरुणाकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई मांगडेवाडी परिसरात करण्यात आली.
याप्रकरणी सोहम गोविंद धुमाळ (वय १८ वर्षे ७ महिने, रा. पुण्यनगरी सोसायटी, आयप्पा मंदिराजवळ, कृष्णा इन्क्लेव्ह, वडगाव-शेरी, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
63bb78ab-b43b-46c5-be0a-ecd5ba7982de
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी आणि सागर बोरगे यांना गोपनीय माहिती मिळाली. सुदरनगर, मांगडेवाडी, कात्रज येथे एक तरुण अग्नीशस्त्रांसह थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.

गुरुदत्त मित्र मंडळ मंदिरालगतच्या मोकळ्या जागेत संशयित तरुण आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे १ लाख १ हजार रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलिस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण सावळे, तुकाराम सुतार आणि संदीप आगळे यांनी सहभाग घेतला.








