वेश्याव्यवसायातून चार विदेशी महिलांची सुटका; एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल


By Avishkar Fule

पुणे, दि. २७ मे २०२६ : अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केलेल्या कारवाईत वेश्याव्यवसायात अडकविण्यात आलेल्या चार विदेशी महिलांची सुटका करण्यात आली असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. २६/०५/२०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाला “अभिभा स्टे, सी-२५, रुम नं. २०, लिबर्टी सोसायटी फेज-२, सी विंग, तिसरा मजला, नॉर्थ मेन रोड, पुणे” येथे विदेशी महिला वेश्याव्यवसाय करत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथकाने माहितीची पडताळणी केली.

बनावट ग्राहकाच्या सहाय्याने खात्री करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. यावेळी तेथून चार विदेशी पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणी एका पाहिजे आरोपीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ७५/२०२६ अन्वये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्विनी सातपुते, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन तसेच मा. सह पोलीस आयुक्त (गुन्हे-४) श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशाल चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, बबनराव केदार, दत्ताराम जाधव, अमेय रसाळ, अविनाश कोंडे तसेच महिला पोलीस अंमलदार वैशाली इंगळे, वैशाली खेडेकर, सुरेखा कांबळे आणि सुरेखा आंधळे यांनी सहभाग घेतला.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!