थेरगावमध्ये ३.९ किलो गांजासह एक जण जेरबंद मोबाईल व दुचाकीसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


By, Sunil ghanvat

पिंपरी, ता. २९ : थेरगाव परिसरात गांजाची वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून ३ किलो ९१५ ग्रॅम गांजा, मोबाईल फोन व दुचाकी असा एकूण ३ लाख ३० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अशोक संतोष आडवाणी (वय २८, रा. पवनेश्वर कॉलनी, थेरगाव गावठाण, पुणे. मूळ रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी रेल्वे स्टेशनजवळ, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा घालण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रदीप जाधव व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यरत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकातील पोलीस अंमलदार सदानंद रुद्राक्षे व गोविंद डोके हे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एमएच १४ एनजे ४१७० क्रमांकाच्या मोपेडवरील संशयित इसमाची हालचाल आढळली. त्यानुसार २७ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास थेरगाव स्मशानभूमीजवळ, गोपाळ जगताप यांच्या घरासमोर सापळा रचून कारवाई करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीकडून गांजा, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मोमीन, महिला पोलीस हवालदार सुषमा पाटील, पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे, गोविंद डोके, कपिलेश इगवे, सुभाष गुरव यांच्या पथकाने केली. तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस अंमलदार सुभाष गुरव यांनी मदत केली.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!