मौजमजेसाठी सायकली चोरी करणारे विधिसंघर्षित बालक ताब्यात; १५ सायकली जप्त


By, Avishkar Fule

पुणे, ता. ५ : येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड आणि नागपूर चाळ परिसरात सायकल चोरीच्या वाढत्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपये किमतीच्या १५ सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

या परिसरात सायकल चोरीच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये चोरीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. त्यानुसार वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास सुरू करण्यात आला.

येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार बालाजी सोगे आणि सोमनाथ गायकवाड यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सायकल चोरी करणारा मुलगा नवी खडकी, येरवडा येथे आजीसोबत राहत असल्याचे समजताच पोलिसांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधून त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली.

Screenshot

चौकशीत संबंधित बालकाने आईचे निधन झाले असून वडील आणि आजोबा गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात कारागृहात असल्याचे सांगितले. घरात सांभाळ करण्यासाठी कोणी नसल्याने आणि मौजमजेसाठी पैशांची गरज भासत असल्यामुळे आपण सायकली चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित बालक दिवसा परिसरात जाऊन पाहणी करत असे. त्यानंतर रात्रीच्या वेळी परिसर ओस पडल्यावर सायकली चोरी करून घेऊन जात असे. त्याच्याकडून एकूण १५ सायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची अंदाजे किंमत एक लाख रुपये आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) रजनिकांत चिलुमुला, सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास डाबेराव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरडमुकुंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाय, साईनाथ म्हस्के, नटराज सुतार, बालाजी सोगे, गणेश पालवे, अनिल मन्हाळकर आणि सोमनाथ गायकवाड यांनी ही यशस्वी कारवाई केली.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!