मेफेड्रोन विक्रीसाठी बाळगणारा आरोपी जेरबंद; 21.08 लाखांचा मुद्देमाल जप्त


By, Avishkar Fule

पुणे, ता. 5 : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-1 ने मोठी कारवाई करत मेफेड्रोन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका आरोपीस अटक केली. आरोपीकडून 21 लाख 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत असताना एच.पी. पेट्रोलपंपाजवळील बसस्टॉप परिसरात, मुंढवा-खराडी रोड येथे एक व्यक्ती संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळले. त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने दोन पंचांसमक्ष झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान आरोपी इमरान युसुफ शेख (वय 38) याच्या ताब्यातून 104 ग्रॅम 92 मिलिग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत 20 लाख 98 हजार 400 रुपये असून, एका मोबाईल फोनसह एकूण 21 लाख 8 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8(क) व 21(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीने हा अंमली पदार्थ कोठून आणला आणि कोणाला विक्री करणार होता याचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार निशिकांत सावंत, अमोल सरडे, रिहान पठाण, संजय राजे, निलेश जाधव, अतुल क्षीरसागर, सचिन लोहार, विजय कांबळे, तुषार साळुंखे, राहुल शिंदे, आशा भिंगारे, जान्हवी सूर्यवंशी, मंगेश गुंड आणि अक्षय शिर्के यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!