पुणे स्टेशन परिसरातून अॅक्टिव्हा चोरणारा सराईत वाहनचोर जेरबंद गुन्हे शाखेच्या युनिट-३ ची कारवाई; चोरीची दुचाकी जप्त


By, Avishkar Fule

पुणे : बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अॅक्टिव्हा दुचाकी चोरी करून पसार झालेल्या सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेच्या युनिट-३ ने जेरबंद केले. युवराज दादा खंडागळे (वय २१, मूळ रा. मांगवाडा, महर्षी कॉलनी, अकलूज, जि. सोलापूर; सध्या रा. पर्वती पायथा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीची अॅक्टिव्हा जप्त करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पथक हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी करत असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. कोथरूड परिसरातील एआरआय कंपनीजवळ, केळेवाडी टेकडी परिसरात एक संशयित इसम चोरीच्या दुचाकीसह थांबला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने तातडीने सापळा रचला.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडील होंडा अॅक्टिव्हा (एमएच १२ झेडएच ९९७७) ही पुणे स्टेशन परिसरातून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तपासात संबंधित दुचाकीबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, आरोपी युवराज खंडागळे याच्यावर अकलूज पोलिस ठाण्यात वाहन चोरीचे यापूर्वीही तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे आणि पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, उपनिरीक्षक मुंकुद तारू, पोलीस अंमलदार अमित बोडरे व शुभम वागस्कर यांनी केली.


19
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!