एक वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद; गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई


By, Avishkar Fule

पुणे, दि. ९ जून : गेल्या सुमारे एक वर्षापासून पोलिसांना हवा असलेला आणि विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत आरोपी शुभम भास्कर लोखंडे (वय २३, रा. धनकवडी, पुणे) याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने तळजाई वसाहत परिसरातून ताब्यात घेतले आहे.

गुन्हे शाखा युनिट-२चे अधिकारी व कर्मचारी परिमंडळ-२ हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार आणि सर्जेराव सरगर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सहकारनगर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४२६/२०२५ मधील फरार आरोपी शुभम लोखंडे हा तळजाई वसाहत परिसरात फिरत आहे.

ही माहिती युनिट-२च्या प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने सापळा रचून तळजाई वसाहत परिसरात कारवाई केली आणि शुभम लोखंडे याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपी हा आंबेगाव पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १५८/२०२६ मध्येही आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला आंबेगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून संबंधित गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम लोखंडे हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त-१ शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दवळी तसेच शंकर कुंभार, सर्जेराव सरगर, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय टकले, योगेश मांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, शिवानंद कायगुडे, सद्दाम तांबोळी, अजीम शेख, साधना ताम्हाणे, विद्या शिंदे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदीप शिर्के, ओमकार कुंभार, ऋषिकेश व्यवहारे आणि विनायक वगारे यांनी ही यशस्वी कारवाई केली.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!