शाळेतून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग; रिक्षाचालकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा


By, अविष्कार फुले

भोर, प्रतिनिधी : शाळेतून घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी आरोपी विजय साळेकर (रा. ता. भोर, जि. पुणे) याने रस्त्यात रिक्षा आडवी लावून मुलीला अडवले. त्यानंतर तिचा हात पकडून जबरदस्तीने रिक्षाकडे ओढत रिक्षामध्ये बसण्यास सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय आरोपीने मुलीशी अयोग्य स्वरूपाचे संभाषण करून तिच्या मनात भीती व लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी भोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे भोर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ७४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खोत करीत असून पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


27
कृपया वोट करा

ठळक घडामोड न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!